Join us  

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 6:54 PM

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली आहे. 

अविनाश खर्शीकर यांनी १९७८ ला बंदिवान मी या संसारी या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली. 

दामिनी या पहिल्या दैनंदिन मालिकेत अविनाश खर्शीकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाइतकीच त्या काळात त्यांच्या दिसण्याची देखील चर्चा होती. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात असे. 

टॅग्स :मराठी