Join us  

मालदीवमधील सोनाली कुलकर्णीच्या ग्लॅमरस फोटोंऐवजी मंगळसूत्राची होतेय जास्त चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 7:40 PM

सोनाली कुलकर्णी सध्या तिचा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती सध्या तिचा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत मालदीवला व्हॅकेशन एन्जॉय करते. यावेळचे फोटो तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र यावेळी तिच्या ग्लॅमरस फोटोऐवजी तिच्या मंगळसूत्राची चर्चा जास्त रंगते आहे.

सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. यात ती कधी बिकनीत तर कधी टू पीसमध्ये पहायला मिळाली. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोत सोनाली आणि तिचा नवरा कुणालची केमिस्ट्री चाहत्यांना भावतो आहे. 

सोनालीच्या ग्लॅमरस फोटोंसोबत तिच्या मंगळसूत्राची चर्चा होताना दिसते आहे. सोनालीने आउटफिटनुसार मंगळसूत्राची निवड केली आहे.

सोनालीने लाल रंगाच्या सिल्व्हर चेन मंगळसूत्र तर काळ्या रंगाच्या कपड्यावर सिल्वर पर्ल मंगळसूत्र परिधान केले आहे. मालदीवहून इंस्टा लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना अनेक नेटकऱ्यांचे लक्ष सोनालीच्या मंगळसूत्राने वेधले होते. सोनालीने हे मंगळसूत्र आद्या ब्रॅण्डकडून बनवून घेतले आहे. मला साधे आणि ट्रेंडी डिझाईनचे मंगळसूत्र हवे होते. म्हणून मी आद्या ब्रॅण्डकडून या मंगळसूत्राची निवड केली. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ७ मे, २०२१ रोजी दुबईत फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले. दुबईतील एका मंदिरात साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.  

 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमालदीव