Join us

​वैभव तत्ववादी ठरला महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 16:34 IST

मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडणाऱ्या वैभव तत्वावादीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. महाराष्ट्राचा ...

मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडणाऱ्या वैभव तत्वावादीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८ हा पुरस्कार त्याला मिळाला असून नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या वैभव तत्ववादीसोबत या स्पर्धेत ५० मॉडेल्स आणि अभिनेते सामिल झाले होते. या साऱ्या मॉडेल्स आणि अभिनेत्यांना मागे टाकून वैभवने महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८ चा पुरस्कार मिळवला.वैभव तत्वावादीचा एक बॉलिवूड चित्रपट सध्या येऊ घातलाय. मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सतत विविध भूमिकांमध्ये दिसणारा वैभव या चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटच्या प्रतिक्षेत आहेत. ऐतिहासिक भूमिकेत वैभवला आपण याआधीही पाहिलंय. या चित्रपटातही त्याची अशीच ऐतिहासिक भूमिका असून राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील पुराण सिंग या सैनिकाच्या भूमिकेत वैभव आपल्याला दिसेल. तसेच अंकिता लोखंडेही त्याच्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत कंगणा राणावत असणार आहे. या चित्रपटाचे शुटींग सध्या जोरात सुरू असल्याचेही सांगण्यात येतंय.पाच वर्षांपूर्वी वैभवने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. अगदी कमी वेळात वैभवने या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलंय. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याने आपल्या कामासाठी कौतुकाची थाप मिळवली आहे. बाजीराव मस्तानी आणि लिपस्टिक अंडर माय बुरखा या दोन्ही चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे रसिक प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलेय. अशाच विविधांगी भूमिका साकारणारा वैभव आता महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८ ठरल्याने त्याचे चाहतेही आनंदी झाले आहेत.वैभव तत्त्ववादीने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. संजय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात वैभवने चिमाजीआप्पाजी भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. Also Read : मनिकर्णिकाः द क्वीन ऑफ झासीमध्ये वैभव तत्त्ववादी दिसणार मुख्य भूमिकेत