Join us  

​ओली की सुकी या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2017 11:52 AM

आनंद गोखले दिग्दर्शित ओली की सुकी या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. सोशल मिडियाद्वारे हे पोस्टर ...

आनंद गोखले दिग्दर्शित ओली की सुकी या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. सोशल मिडियाद्वारे हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आले आहे.    समाजात जगताना आपण सगळेच कधी स्वतःच्या मर्जीने तर कधी परिस्थितीमुळे मुखवटे चढवून जगत असतो. पण कधीतरी आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपले अवघे आयुष्यच बदलून जाते. ओली की सुकी या चित्रपटात एका वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या बाबतीत असेच काहीसे घडते.ओली की सुकी या चित्रपटात प्रेक्षकांना तेजश्री प्रधान पाहायला मिळणार आहे. तेजश्रीने होणार सून मी या घराची या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनात एक स्थान मिळवले आहे. या मालिकेत तेजश्रीने साकारलेली जान्हवी ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. आता तेजश्री प्रधान एका समजूतदार, प्रेरणादायी अशा भूमिकेतून या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ओली की सुकी या चित्रपटाचे निर्माते वैभव उत्तमराव जोशी असून त्यांच्या नलिनोत्तम प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जिंदगीला नडणारे आवडतात, रडणारे नाय! असे म्हणत या चित्रपटात समाजाने वाया ठरवलेल्या मुलांवर भाष्य करण्यात आले आहे.अतिशय संवेदनशील विषयावर असणाऱ्या या चित्रपटात तेजश्री प्रधानसह भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बालकलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाविषयी लोकांची उत्कंठा वाढली आहे.