Join us  

हा असणार रिमा लागू यांचा शेवटचा चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:26 AM

रिमा लागू यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होम स्वीट होम असे त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात त्या एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

रिमा लागू यांचे निधन 18 मे 2017 ला झाले. त्यांच्या मृत्युला वर्षं होऊन गेले आहेत. रिमा लागू या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांचा आता शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होम स्वीट होम असे त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात त्या एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन, प्रसाद ओक, मोहन जोशी, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, क्षिती जोग, हृषिकेष जोशी असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता हृषिकेश जोशीने केले आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणाऱ्या रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते. मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है कौन, वास्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ है या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची आईची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. रिमा लागू यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेने लक्ष वेधून घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. मराठी रंगभूमीपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यांचे खरे नाव नाव नयन भडभडे होते तर त्यांची आई मंदाकिनी भडभडे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे लेकुरे उदंड जाहले हे नाटक प्रचंड गाजले होते.कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी सिनेमा. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांचे हे सर्व रोल्स चांगलेच गाजले. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी आक्रोश सिनेमात डान्सरची भूमिका केली होती. सुप्रिया पिळगावकर बरोबरची तू तू मैं मैं, श्रीमान-श्रीमती या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या होत्या.