Join us  

'प्रथमेश माझं तुझ्यावर खूप प्रेम ...', 'दगडू'च्या खऱ्या आयुष्यातील 'प्राजू' ची खास बर्थ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 1:23 PM

प्रथमेशच्या वाढदिवशी त्याची मैत्रीण क्षितीजा घोसाळकर हिनं प्रथमेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

मराठी सिनेसृष्टीत कमी वयात नाव कमावलेल्यांपैकी प्रथमेश परब हा एक आहे. प्रथमेशने साकारलेल्या 'दगडू' या भूमिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं. आजही त्याला चाहते 'दगडू' नावानेच हाक मारतात.  आज प्रथमेश ३० वा वाढदिवस साजरा करत आहे.  प्रथमेशच्या वाढदिवशी त्याची मैत्रीण क्षितीजा घोसाळकर हिनं प्रथमेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तर सर्वांचा लाडक्या 'दगडू'च्या खऱ्या आयुष्यातील 'प्राजू' बद्दल आपण जाणून घेऊया.

प्रथमेशच्या वाढदिवशी त्याची मैत्रीण क्षितीजा घोसाळकर हिनं प्रथमेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ज्यात शुभेच्छांबरोबरचं तिच्या आणि प्रथमेशमध्ये असलेल्या नात्यावरही लिहिलं आहे. ती म्हणाली, ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍'तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सर्वकाही छान झालं आहे. तुझ्यासारखी वैचारिक, काळजी करणारी आणि प्रेमळ व्यक्ती माझ्याकडे आहे, यासाठी मी स्व:ताला भाग्यवान समजते. तू अविश्वसनीय असून मला दररोज प्रेरणा देतोस. तु माझा आहेस, याचा मला खूप आनंद आहे'. 

पुढे ती म्हणाली, 'तू माझा आहेस, याचा मला खूप आनंद आहे. आपल्यातील मजबूत नात्याशिवाय मला दुसरं काहीच नकोय...माझं जग असलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...तु माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस, हे तुला कळावं यासाठी हा अट्टहास... भविष्यातील सर्व वाढदिवस तुझ्यासोबत साजरे करण्यासाठी मी आतूर आहे... माझं तुझ्यावर प्रेम आहे', या शब्दात क्षितीजाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 क्षितिजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट असून फॅशन डिझायनिंगचीही तिला आवड आहे.  प्रथमेश आणि क्षितिजा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेंकाना डेट करत आहेत. प्रथमेश आणि क्षितिजानेदेखील #Pratija असे आपले नाव तयार केले आहे. प्रथमेशचे चाहते तो कधी बोहल्यावर चढतो, याची वाट पाहत आहेत. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास,  त्याने दृश्यम, उर्फी, टकाटक १, टकाटक २, बालक पालक, ढिश्क्यांव यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेतासेलिब्रिटी