Join us  

Sharad Kelkar Net Worth : कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारालाही देतो टक्कर, जाणून घ्या संपत्तीचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 11:15 AM

छोट्या पडद्यावर रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला शरद केळकर रुपेरी पडद्यावरही हिट ठरला. 'एविल रिटर्न्स', 'लय भारी', 'रामलीला', 'मोहन्जेंदडो', 'भूमी', 'हाऊसफुल्ल-4' अशा सिनेमातही तो झळकला. 

अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे.छोट्या पडद्यावरील 'आक्रोश' या मालिकेतून अभिनयाची कारकिर्द सुरु केल्यानंतर 'सात फेरे', 'बैरी पिया', 'कुछ तो लोग कहेंगे' मालिकेतून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. छोट्या पडद्यावर रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला शरद केळकर रुपेरी पडद्यावरही हिट ठरला. 'एविल रिटर्न्स', 'लय भारी', 'रामलीला', 'मोहन्जेंदडो', 'भूमी', 'हाऊसफुल्ल-4' अशा सिनेमातही तो झळकला. 

मात्र त्याच्या कारकिर्दीतील सगळ्यात लक्षवेधी भूमिका त्याने साकारली 'तान्हाजी 'या सिनेमात. या सिनेमात शरदने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साऱ्यांनाच भावली. त्यानंतर 'लक्ष्मी'  या सिनेमातल्या भूमिकेवर अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. शरद केळकर आज रसिकांचा आवडता कलाकार बनला आहे. 

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर  7 ऑक्टोबर 1976 शरद केळकरचा जन्म झाला होता. शरद केळकर आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आपले संपूर्ण शिक्षण ग्वाल्हेर पूर्ण केले आहे. प्रेस्टीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्याने एमबीए केले आहे.शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरद स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करायचा. मात्र अभिनयाची आवड त्याला स्वस्त बसू देत नव्हती. छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात करणारा शरद आज मोठा स्टार बनला आहे. 

जगाच्या कानाकोपऱ्या  त्याचा भला मोठा चाहता वर्ग आहे.त्याच्याविषयी जाणून घेण्यात प्रत्येकांलाच उत्सुकता असते. शरद केळकर पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी तो त्याच्या सिनेमामुळे नाहीतर त्याच्या एकुण संपत्तीविषयी चर्चा सुरु आहे.अभिनयाने सर्वांची मनं जिंकलेला शरद केळकर संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांनाही टक्कर देतो.

marathibio.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार शरदची नेट वर्थ 5-10 मिलियन इतकी आहे. सिनेमा, मालिका आणि जाहिराती हे त्याच्या कमाईचे मुख्य साधन आहे. याव्यतिरिक्त तो वॉइस ओवर आर्टीस्ट म्हणूनही काम करतो. अनेक सिनेमांच्या प्रोजेक्टला त्याने आवाज दिला आहे. वॉइस ओवर करण्यासाठी तो भलीमोठी रक्कम तो चार्ज करतो.‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही सुपरहिट ठरलेल्या सिनेमांना प्रभासच्या व्यक्तिरेखासाठी शरद केळकरनेच आवाज दिला होता.  

टॅग्स :शरद केळकर