Join us  

"केवळ शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही" मृणाल कुलकर्णी म्हणाल्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 6:00 AM

मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमधून ती पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.

सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी बरीच ऍक्टिव्ह असतात. आपापल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, आगामी सिनेमा, त्यांचे ट्रेलर, पोस्टर याची प्रत्येक गोष्ट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट फॅन्सशी संवाद साधता येत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक सेलिब्रिटी इथं रुळल्याचं पाहायला मिळते. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने रसिक सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. 

मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम देखील केलं. २०१९मध्ये सगळ्यांच्या लक्षात राहिलेली मृणाल कुलकर्णी यांची भूमिका म्हणजे फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका. जिजाऊ आऊसाहेबांचं युद्ध नैपुण्य आणि राजकारणातल कौशल्य दाखवण्याची संधी मृणाल यांना फत्तेशिकस्तच्या माध्यमातुन मिळाली. चित्रपटासोबतच मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमधून ती पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.

सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंजत असताना मृणाल शिवाजी महाराजांच्या धैर्य आणि संयमाने शत्रूवर विजय मिळवण्याच्या शिकवणीला लक्षात ठेवून म्हणाल्या, "फक्त शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर महाराजांचं चरित्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्यातल्या अनेक गोष्टी आपण अंगी बाळगायला शिकलं पाहिजे. कोरोनाच्या संकटातसुद्धा आपण महाराजांसारखं सकारात्मक राहून या संकटातुन आपली सुटका करून घेतली पाहिजे."

त्यामुळे जीवनाविषयीची त्यांची पोस्ट रसिकांना आणि त्याच्या फॅन्सना नवी ऊर्जा देईल. तसंच  फॅन्सही जीवनाकडे आणि घडणा-या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील यांत शंका नाही. तुमच्या पुढे कितीही कठीण प्रसंग आला तरी खचून जाऊ नका असा संदेशच माध्यमातून त्याच्या फॅन्सना दिला आहे.    

टॅग्स :मृणाल कुलकर्णी