Join us

​मानुषी छिल्लरच्या यशात या मराठमोळ्या अभिनेत्याचा देखील वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 11:16 IST

जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्य स्पर्धेचाचा यंदाचा मुकुट भारताच्या मानुषी छिल्लरने ...

जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्य स्पर्धेचाचा यंदाचा मुकुट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला. १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००० मध्ये प्रियांका चोप्रा हिने हा मुकुट जिंकला होता. प्रियांकानंतर मानुषीने हा ताज पटकावला आणि हा किताब पटकावणारी ती भारताची सहावी सौंदर्यवती ठरली. मानुषीच्या आधी रिता फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा यांनी हा किताब मिळवला आहे. मानुषीच्या या यशामुळे आज केवळ तिच्या घरातील लोकच नाहीत तर भारतातील सगळेच खूश आहेत. तिने आजवर घेतलेल्या मेहनतीमुळेच तिला हे यश मिळवता आले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, मानुषी छिल्लरच्या यशात एका मराठमोळ्या अभिनेत्याचा देखील वाटा आहे. मानुषी छिल्लरच्या यशात नकुल घाणेकर या मराठमोळ्या अभिनेत्याचा वाटा आहे. नकुलनेच याबाबत नुकतेच सांगितले आहे. सध्या मानुषीला मिळालेल्या यशाबद्दल नकुल खूपच खूश आहे. नकुश घाणेकर हा एक अभिनेता असण्यासोबतच खूपच चांगला डान्सर आहे. त्याच्या नृत्याचे, नृत्य दिग्दर्शनाचे नेहमीच कौतुक केले जाते. मिस वर्ल्ड या स्पर्धेसाठी मानुषीने सादर केलेल्या सगळ्या नृत्यांचे नृत्य दिग्दर्शन हे नकुश घाणेकरने केले होते. मिस वर्ल्डसाठी मानुषी तयारी करत असताना तिच्या टॅलेंट राऊंडची तयारी नकुलनेच करून घेतली होती. तिने सादर केलेल्या नृत्याचे दिग्दर्शन त्याने केले होते. मेरे ढोलना या गाण्यावर मानुषीने एक भरतनाट्यम-कुचीपुडी मिक्स असा परफॉर्मन्स सादर केला होता तर लोककला सादर करण्यासाठी तिने नगाडे संग ढोल बाजे या नृत्याची निवड केली होती. या गाण्यावर तिने राजस्थानी लोकनृत्य सादर केले होते. या दोन्ही गाण्याचे नकुलने खूपच चांगल्या प्रकारे नृत्य दिग्दर्शन केले होते. अस्मिता, जय मल्हार, अजूनही चाँद रात आहे, अनोळखी यांसारख्या मालिकांमध्ये नकुलने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रतिबिंब, संघर्ष यांसारख्या चित्रपटांमधील नकुलच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.Also Read :  ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब जिंकणा-या मानुषी छिल्लरबद्दल काही खास गोष्टी...!