Join us

भारताचे वास्तव रूप चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 16:01 IST

आय एम नॉट स्लमडॉग आय एम इंडियन हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर केवळ ...

आय एम नॉट स्लमडॉग आय एम इंडियन हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर केवळ भारताच्या गरिबाचंच दर्शन घडवण्यात आलं आहे. आपल्या देशाचं खरं रूप कधीच पडद्यावर आलेलं नाही. या चित्रपटात हाच धागा पकडला गेला आहे.राजन डोगरा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडे वळलेल्या युगने या चित्रपटात भारतातील वास्तव दाखवले आहे. एका धाडसी, धडाकेबाज, जीगरबाज तरूणाच्या माध्यमातुन  युगने या चित्रपटाची कथा मांडली आहे.  या चित्रपटामध्ये उषा नाडकर्णी, उदय सबनीस, राजन राणे, शामलाल नावत, उमेश बोळके,अजहर भट, नीलांबरी, दुर्गेश नाबर, तेजस मानकर, स्वकीत, स्वप्निल मोरे या कलाकारांचा समावेश आहे.