Join us  

ऋता दुर्गुळेने शेअर केला सेटवरचा फोटो, सुव्रत जोशी म्हणाला- बरं आहे हां तुमचं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 5:27 PM

सुव्रत जोशीच्या कमेंटने सगळ्यांच लक्ष वेधलंय.

छोट्या पडद्यावरील ऋता दूर्गुळे हे प्रसिद्ध नाव आहे. आपल्या विविध भूमिकेंच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.ऋता सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. ऋताने सेटवरचा फोटो शेअर केला आहे.डोळ्यावर काळा गॉगल लावून या फोटोत ती रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय. ऋताच्या या फोटोवर चाहत्यांसह मराठी सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत. यावर सुव्रत जोशीच्या कमेंटने सगळ्यांच लक्ष वेधलंय. बरं आहे हां तुमचं भारी जागांवर शूट करता तुम्ही. अशी कमेंट सुव्रतने ह्रताच्या फोटोवर केली आहे.

लवकरच ऋता एका वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. अशी माहिती तिनेच काही दिवसांपूर्वी दिली होती. यात ती अदिती नावाची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी ती उत्सुक असल्याचे तिने सांगितले होते. या वेबसीरिजचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र ऋताचे फॅन्स तिला वेबसीरिजमध्ये बघण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील. काही दिवसांपूर्वीच ऋता सिंगिग स्टार या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसली होती.  

मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ऋता दुर्गुळे वेगळं स्थान निर्माण केले आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ऋता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळे