सिद्धार्थ मृण्मयीला का म्हणाला हिटलर ? जाणून घ्या आमच्यासोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2016 2:35 PM
अभिनेता सिदधार्थ चांदेकर कोणाला हिटलर म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला देखील पडला ना? आपण ज्या व्यक्तीला जास्त घाबरतो किंवा जी ...
अभिनेता सिदधार्थ चांदेकर कोणाला हिटलर म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला देखील पडला ना? आपण ज्या व्यक्तीला जास्त घाबरतो किंवा जी व्यक्ती अतिशय कडक असते तिलाच आपण हिटलर ही पदवी बहाल करतो. सिदधार्थच्या आयुष्यात देखील असाच एक हिटलर आहे. आणि हा हिटलर कोणी शाळा, कॉलेज मधील नाही तर तो आहे, मराठी चित्रपसृष्टीतीलच. तुम्ही म्हणाल की आता चित्रपटसृष्टीत हिटलर म्हणजे नक्कीच तो एक दिग्दर्शक किंवा निर्माता असेल. परंतू तसे बिलकुलच काही नाहीये. हा हिटलर कोणी मुलगा नसुन ती एक लेडी हिटलर आहे. होय, चित्रपटसृष्टीतील मुन्ना पांडे म्हणजेच आपली मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेलाच सिदधार्थ हिटलर म्हणतो याचा नुकताच खुलासा झालेला आहे. सिदधार्थ आणि मृण्मयी एकमेकांचे फार जुने मित्र आहेत. त्यांनी एकत्र काम देखील केले आहे. पण असे असुन सुदधा या सुंदर अभिनेत्रीली तो हिटलर का म्हणतो असे नक्कीच सर्वांना वाटणार हे साहजिकच आहे. याबद्दल सिदधार्थने लोकमत सीएनएक्सशी मनमोकळ््या गप्पा मारीत मृण्मयीच्या हिटरलशाहीचा खुलासा केला आहे. सिदधार्थ सांगतो, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये एकत्र होतो त्यावेळी मृण्मयी आमची नाटके बसवायची, तालमी घ्यायची. ती इतरवेळी फारच शांत आणि खुप चांगली आहे. परंतू नाटके बसवायच्या बाबतीत ती फारच स्ट्रीक्ट होती. तिला तालमीच्या वेळी देखील सगळं काही शिस्तीतच लागायचे. नाटके बसवताना ती फार कडक असायचीआणि तेव्हापासूनच आम्ही तिला हिटलर म्हणायचो. हा किस्सा सिदधार्थने सीएनएक्ससोबत एकदम हसत हसत शेअर केला आहे.