हेमांगी कवी आणि सुहास परांजपेला लागली लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 10:46 IST
हेमांगी कवी आणि सुहास परांजपे या दोघांनाही म्हाडाची लॉटरी लागली असून त्यांना बोरिवलीत घर मिळणार आहे. मुंबईत घर घेण्याचे ...
हेमांगी कवी आणि सुहास परांजपेला लागली लॉटरी
हेमांगी कवी आणि सुहास परांजपे या दोघांनाही म्हाडाची लॉटरी लागली असून त्यांना बोरिवलीत घर मिळणार आहे. मुंबईत घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. पण घराच्या वाढत्या किंमतींमुळे अनेकांना ते शक्य होत नाही. या लॉटरीमुळे या दोघींचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. हेमांगी कवी ती फुलराणी या नाटकामुळे प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने अनेक नाटकांत आणि चित्रपटांत काम केेले. सुहास परांजपे सध्या नांदा सौख्यभरे या मालिकेत काम करत आहे.