Join us  

अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या मुलाला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 6:00 AM

Deepali Sayed : दिपाली सय्यद यांच्या मुलाबद्दल फारसं कुणाला माहित नाही. त्याचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे. दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला. त्यानंतर चित्रपटात एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून मराठी सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. अभिनेत्री सोबतच त्या उत्तम डान्सर आहेत. दीपाली सय्यद यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. फार कमी जणांना दिपाली सय्यद यांच्या मुलाबद्दल माहित आहे. त्याचा देखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

दिपाली सय्यद यांच्या मुलाचे नाव अली सय्यद असे असून तो फोटोग्राफी करतो. फोटोग्राफीची त्याला आवड असून त्याने अनेक दिग्गजांनी फोटोग्राफी देखील केली आहे. नुकताच त्याचा वाढदिवस होता. त्यावेळी दिपाली सय्यद यांनी त्याच्यासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिपाली सय्यद यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीला बंदिनी, समांतर या मालिकेत काम केले आहे. जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात. मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून त्यांना मिळाली.

दीपाली सय्यद यांच्या डान्सचे देखील लाखो चाहते आहेत. आतापर्यंत अनेक डान्स रिआलिटी शोजमध्ये दीपाली परिक्षक म्हणून पाहायला मिळाल्या आहेत. त्यांनी करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.

टॅग्स :दीपाली सय्यद