Join us

दोन चिमुकल्यांच्या निरागस स्वप्नांचे हाफ तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 14:46 IST

प्रियांका लोंढे               दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करण्याची पद्धत आपल्याकडे काही नवीन नाही. अनेक ...

प्रियांका लोंढे               दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करण्याची पद्धत आपल्याकडे काही नवीन नाही. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना मराठमोळा तडका याआधी दिला गेलाय. चित्रपटाची गोष्ट माल-मसाला लावून, रंगवून प्रेक्षकांसमोर पेश करण्याची मजा या साऊथ सिनेमांमध्ये असते. काक मुत्ताई या अशाच ऐका साऊथ सिनेमाचा रिमेक दिग्दर्शक समीत कक्कड यांनी मराठीमध्ये केला अन साऊथचा सिनेमाही फिका पडेल अशी दोन चिमुकल्यांची कथा त्यांनी हाफ तिकीटच्या माध्यामातून पडद्यावर रंगविली.             झोपडपट्टीत आई अन आजीसह राहणाºया दोन भावांची ही गोष्ट सुरु होते त्यांच्या दैनंदिन प्रवासापासुन. ट्रेनच्या पटरीवर जाऊन कोळसा गोळा करुन तो विकुन पैसे कमावणे हे यांचे जीवन. वडिल जेल मध्ये असल्याने आई मोल-मजुरी करुन घर चालवित असते. जवळच एक पिझ्झाचे दुकान सुरु होते आणि मग या दोन चिमुकल्यांच्या संघषार्ची कहाणी ईथुनच वेग घेते. आपल्याला त्या दुकानात जाऊन पिझ्झा खायचा हे धय्यच जणु काही हे चिमुकले उराशी बाळगतात. ३०० रुपयाचा तो पिझ्झा कोळसा विकणारी ही मुले काय खाणार म्हणुन मित्रांमध्ये त्यांची हेटाळणी होते. पण काही झाले तरी आम्ही पिझ्झा खाणारच हा हट्ट काही ते सोडत नाहीत. त्यांच्या या भाबड्या इच्छेची ही सुंदर गोष्ट आहे.          झोपडपट्टीमध्ये जरी हे कुटूंब राहत असले तरी आपल्या परीने जगण्याचा पुरेपुर आनंद घेणारे हे दोन भाऊ पाहताना त्यांची दया येण्यापेक्षा चेहºयावर हसु खुलते. अगदी छोटे छोटे प्रसंग भावनिक करुन त्याला वास्तवाची जोड देण्यात आली आहे. संपुर्ण सिनेमा हा झोपडपट्टीत जरी चित्रीत करण्यात असला तरी त्यातील लोकेशन्स महत्वाची भुमिका बजावताना दिसतात. भंगारचे दुकान, रेल्वेची पटरी, नाल्याच्या कडेला असलेले घर, पाईपलाईन्स या गोष्टी दिग्दर्शकाने योग्य रितीने टिपल्या आहेत. चित्रपटातील रुबाब अन चल चल चल ही गाणी ऐकताना अन पाहताना अप्रतिमच वाटतात. संगीत ही या कथेची जमेची बाजु असल्याचे या गाण्यांतून दिसुन येते.             प्रियांका बोस या बंगाली अभिनेत्रीने अस्सलीखित मराठी बोलुन अगदी काळीज पिळवटून टाकेल अशी आई साकारली आहे. दोनही मुलांप्रति असलेली काळजी अन काही भावनिक प्रसंग प्रियांकाने लाजवाब साकारले आहेत. तर उषा नाईक यांच्यामध्ये नातवांवर जीव ओवाळणारी आजी दडलेली आहे. भाऊ कदम यांनी साकारलेले टुटीफ्रुटी हे पात्र देखील विशेष लक्षणीय आहे. तर झोपडपट्टीतील वास्तव जीवन दाखविण्यासाठी वापरण्यात आलेल्या लहान मुलांचा गु्रप किंवा दोन चोरटी पोर, भंगार वाल्याची बायको यांच्यामुळे सिनेमा जास्त उठावदार व्हायला मदत होते.            राजकारणी, व्यावसायिक अन जनतेसाठी काम करणारे कार्यकर्ते देखील वेळ पडल्यास काय करु शकतात हे उत्तम प्रकारे सिनेमात उतरविण्यात आले आहे. उत्तम दिग्दर्शन, छायांकन, पटकथा, संवाद, अगदी छोट्या छोट्या कॅरेक्टर्सचा अभिनय सुद्धा लक्षात राहतो. या दोन हाफ तिकीटांच्या स्वप्नांची ही सुंदर कथा अनुभवण्यासाठी हा सिनेमा नक्कीच बघावा.