Join us  

स्वप्नील जोशीने प्रेक्षकांचे आभार मानत दिली ही खुशखबरी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 7:27 PM

स्वप्नील जोशीच्या सोशल मीडियावरील पोस्टवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

अभिनेता स्वप्नील जोशीच्या समांतर या वेबसीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समांतर वेबसीरिज प्रदर्शित होऊन आज एक वर्ष झाली आहेत. त्यानिमित्ताने स्वप्नील जोशीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय त्याने केक कटिंग करत हा आनंद साजरा केला. 

स्वप्नील जोशीने इंस्टाग्रामवर कॅमेऱ्याची स्क्रीन शेअर करत लिहिली की, लोकांच्या मनात स्थान मिळवलेली वेब मालिका म्हणजे समांतर १ ! कथा , पटकथा , लेखन , संवाद सादरीकरण आणि दिग्दर्शन व निर्मिती यांचा उत्तम योग साधत ही वेब सिरीज अगदी अल्प कालावधीत तुमच्या पसंतीस पडली. एक एक रहस्य उलगडत त्यातली गूढ गोष्ट तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही केलेला हा एक प्रयत्न होता. " 

त्याने पुढे लिहिले की, दर्जेदार कथा , उत्तम दिग्दर्शक , निर्माते , कलाकार , टेक्निकल टीम, गुढ आणि तितकाच अफलातून सेटअप असलेल्या " समांतर १ " ला आज वर्ष पूर्ण होतंय. मराठी वेब दुनियेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी वेब सिरीज म्हणून आज समांतर ओळखली जाते. अनेक कमालीच्या लोकांच्या प्रयत्नामधून ही वेब मालिका आम्ही गेल्या वर्षी तुमच्या साठी घेऊन आलो आणि तुम्ही तिच्यावर जे भरभरून प्रेम केलंय हे आज शब्दात मांडणं थोड कठीण आहे.

समांतर १ च्या अभूतपूर्व यशानंतर आम्ही लवकरच समांतर २ घेऊन येत आहोत. समांतर २ बद्दल तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता आम्हाला देखील आहे म्हणून आज समांतर १ च्या वर्ष पूर्ती निमित्ताने आम्ही सगळ्यांचे आभार मानत आहोत. तुमचं प्रेम तुमचा पाठींबा कायम राहू देत. समांतर १ च्या संपूर्ण टीम चे आभार. स्वर्गीय सुहास शिरवळकर , शिरवळकर ताई , कार्तिक - अर्जुन , जीसिम प्रोडक्शन , दिग्दर्शक सतीश राजवाडे , लेखक अंबर हडप , तेजस्विनी पंडित , गणेश रेवडेकर , नितीश भारद्वाज ही कलाकार मंडळी , एमएक्स प्लेअर सारखा आघाडीचा डिजिटल पार्टनर यांनी आम्हाला ही संधी दिल्या बद्दल त्यांचे खास आभार. तुमचं हे प्रेम कायम असू देत. मराठी प्रेक्षकांच्या सोबतीने बहुभाषिक प्रेक्षकांनी देखील समांतर १ वर तितकच भरभरून प्रेम आणि कमालीचा प्रतिसाद दिला आहे. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार, असे स्वप्नील जोशीने पोस्टमध्ये म्हटले.

टॅग्स :स्वप्निल जोशीतेजस्विनी पंडित