Join us

भगवानदादांची कर्तबगारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 13:13 IST

१९३१ पासून सुरू झालेला भगवान दादांचा अलबेला प्रवास आयुष्याच्या अंतापर्यंत सुरू राहिला. या प्रवासात त्यांनी अ‍ॅक्शनपट ते सत्तर मिलीमीटर असे एक वर्तुळ तयार केले. आज विलेनला मारधाड करून हिरो प्रेक्षकांत भाव खाऊन जातो. या फाइट सिक्वेन्सेसची ओळख सिनेसृष्टीला भगवान दादांनी करून दिली. अशा प्रकारे अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्स,हॉररपट ही या चित्रपटांची ओळख देखील इंडस्ट्रीला भगवान दादांनीच करून दिली. यानंतर १९५१ मध्ये अलबेलाच्या निमित्ताने सोशल सिनेमा भगवान दादांनी सिनेदृष्टीला दिला.

१९३१ पासून सुरू झालेला भगवान दादांचा अलबेला प्रवास आयुष्याच्या अंतापर्यंत सुरू राहिला. या प्रवासात त्यांनी अ‍ॅक्शनपट ते सत्तर मिलीमीटर असे एक वर्तुळ तयार केले. आज विलेनला मारधाड करून हिरो प्रेक्षकांत भाव खाऊन जातो. या फाइट सिक्वेन्सेसची ओळख सिनेसृष्टीला भगवान दादांनी करून दिली. अशा प्रकारे अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्स,हॉररपट ही या चित्रपटांची ओळख देखील इंडस्ट्रीला भगवान दादांनीच करून दिली. यानंतर १९५१ मध्ये अलबेलाच्या निमित्ताने सोशल सिनेमा भगवान दादांनी सिनेदृष्टीला दिला. या चित्रपटासाठी त्यांनी गीता बालीला कास्ट केले. यानंतर शूटींगला सुरूवात झाली आणि एक नवे संकट दादांच्या वाट्याला आले. राज कपूर यांच्या आवारा चित्रपटासाठी त्यांनी इंडस्ट्रीतले सगळे डान्सर्स १० दिवसांसाठी बुक करण्यात आले होते. आणि त्याच दरम्यान भगवान दादांनी शोला जो भडके या गाण्याच्या चित्रिकरणाचा सेट उभारला होता. पुन्हा एवढा मोठा सेट उभारण्याचा खर्च शक्य नव्हता. तेव्हा भगवान दादांच्या पारखी नजरेने फायटर्समध्ये डान्सर्स शोधले आणि त्यांच्याकडून डान्स करून घेतला. अशी सगळी संकटे पार करत अलबेला घडला आणि भगवान दादांची मेहनत फळली. तब्बल २४ आठवडे या सिनेमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेच शिवाय 20 वर्षांनी हा सिनेमा जेव्हा पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. याच अवलियाचे आयुष्य उलगडणारी कलाकृती म्हणजे एक अलबेला मंगलमूर्ती फिल्मस आणि किमया मोशन पिक्चर्स भगवान दादांच्या आठवणींचा हा अल्बम येत्या २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. भगवान दादांच्या भूमिकेत मंगेश देसाई तर गीता बालीच्या भूमिकेत विदया बालन दिसणार आहे.