Join us  

या अभिनेत्रीच्या मेकओव्हरची रंगलीय सगळीकडे चर्चा, दिसतेय खूपच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:22 AM

या फोटोत ही अभिनेत्री बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देगायत्री दातार सध्या फिरायला गोव्याला गेली असून तिच्या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

गायत्री दातार सध्या फिरायला गोव्याला गेली असून तिच्या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. गायत्री या फोटोत खूपच बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गायत्रीच्या या फोटोला 34 हजारहून अधिक  लाईक मिळाले आहेत. 

‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर आणि सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना भुरळ पाडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीदेखील या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

‘तुला पाहते रे’ या मालिकेत ईशाच्या भूमिकेत असलेली गायत्री दातार प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘तुला पाहते रे’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर गायत्रीने निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकात ती शहजादीच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :गायत्री दातार