Join us  

गश्मीर महाजनीचा लेकासोबतचा फोटो रसिकांना भावला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:53 PM

मॉर्निंग रिच्युअल्स म्हणजेच सकाळचा दिनक्रम अशी प्रतिक्रिया त्याने या फोटोसह दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनी ओळखला जातो. आपल्या अभिनयानं मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळवला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. याच कारणामुळे त्याचा प्रत्येक चाहता त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. आपल्या जीवनातील सुखद क्षण, फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने शेअर केलेला फोटो त्याच्या फॅन्सना भावतोय.

या फोटोत गश्मीर आपल्या बाळासोबत खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी बापच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. मॉर्निंग रिच्युअल्स म्हणजेच सकाळचा दिनक्रम अशी प्रतिक्रिया त्याने या फोटोसह दिली आहे.

 

या फोटोवर गश्मीरच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. गश्मीर महाजनी आणि त्याची पत्नी गौरी देशमुख यांच्या जीवनात २१ डिसेंबरला नव्या पाहुण्याचे आगमन झालं. पिता झाल्यामुळे जबाबदारी आणखी वाढल्याचंही गश्मीरने म्हटले होते.

 

सिनेमासह गश्मीर रंगभूमीही गाजवत आहे. ‘अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्यात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारत आहे. त्याच्या या भूमिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे.

 

युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला मोक्याच्या ठिकाणी आणून पराजित करणे ही बाजीराव पेशवेंची वैशिष्ट्ये या महानाट्यात अचूक टिपण्यात आली आहेत. १०० फूट लांबी, रुंदी असलेला भव्य- दिव्य असा रंगमंच, १३० कलाकार, उत्कृष्ट ध्वनी नियोजन, नेपथ्य, रंगसंगती, पेहराव या सर्वच गोष्टी अतिशय भव्य स्वरूपात आहेत.  

टॅग्स :गश्मिर महाजनी