Join us  

परश्याला विसरा रिंकू राजगुरुच्या रॉकींग अंदाजाने बॉलिवूड अभिनेत्याला केले क्लिन बोल्ड,अभिनेत्याची कमेंट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:50 PM

रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकतेच दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.

सैराटच्या आर्चीला रसिकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं. रिंकूने साकारलेल्या आर्चीने रसिकांना वेड लावलं. रिंकूच नाही तर परश्याही तितकाच आवडता बनला. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकतेच दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. 

सैराट सिनेमानंतर अशा प्रकारे दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला. यावेळी दोघांचाही स्टायलिश अंदाजानेही चाहत्यांना आकर्षित करुन गेला. दोघांचा फोटोंवर चाहत्यांनी कमेंटस करत पसंती देत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर रिंकू राजगुरु तिच्या खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अतिशय स्टायलिश रॉकींग अंदाज तिच्या या नवीन फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहे.

रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिंकूच्या या फोटोंवर चाहतेच नाहीतर सेलिब्रेटी मंडळींनीदेखील कमेंट्स लाईक्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यांमध्ये एक बॉलिवूड अभिनेत्यानेही रिंकूच्या फोटोवर कमेंट केली आहे. रिंकूच्या फोटोवर या अभिनेत्याची कमेंट सध्या चर्चेत आहे. कमेंट करणारा दुसरा तिसा कोणी नसून तो आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर. रिंकूचा रॉकिंग अंदाज पाहून इशानही स्वतःला कमेंट करण्यासाठी स्वतःला रोखू शकला नाही. इशानने रिंकूच्या फोटोवर केलेल्या कमेंटनेच सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

सैराटच्या बॉलिवूड रिमेकमध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर दोघांनाही भूमिका साकरल्या होत्या. मराठी प्रमाणे या हिंदी रिमेकलाही रसिकांनी पसंती दिली होती. इशान आणि जान्हवी दोघांची रिंकू आणि आकाश ठोसर या दोघांशीही तुलना झाली होती. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी जान्हवी कपूरने आवर्जुन रिंकूची भेटही घेतली होती. तुर्सास आगामी काळात रिंकू राजगुरु आणि इशान खट्टर रुपेरी पडद्यावर एकत्र झळकल्यास आश्वर्य वाटू नये.

टॅग्स :रिंकू राजगुरूइशान खट्टर