Join us

सचिन-स्वप्नील पहिल्यांदाच पडद्यावर रेखाटणार पिता-पुत्राचे भावबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 12:39 IST

ऑफस्क्रिन असो वा ऑनस्क्रिन ही जोडी सगळ्यांच्याच आवडीती आहे.मानसपितापुत्रांच्या या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य गाजवलं.पडद्यावर यांनी ...

ऑफस्क्रिन असो वा ऑनस्क्रिन ही जोडी सगळ्यांच्याच आवडीती आहे.मानसपितापुत्रांच्या या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य गाजवलं.पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.आपल्या वैयक्तिक आयुष्यात सचिन पिळगांवकरांची जागा खास असून ते आपल्याला वडिलांच्या स्थानी असल्याचं म्हणणारा स्वप्नील जोशी तर स्वप्नील ला मुलासारखं वागवणारे सचिन पिळगांवकर. पितापुत्राचे भावबंध खऱ्या अर्थी जपणारी ही जोडी आता पडद्यावर हे नातं साकारण्यास सज्ज झाली आहे.2008 मध्ये आलेल्या 'आम्ही सातपुते' या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली आणि यांचं अनोखं बाँडिंग पाहून प्रेक्षकही सुखावले.त्यानंतर आलेल्या काही गप्पांच्या कार्यक्रमात या जोडीच्या दिलखुलास गप्पांनी या दोघांमधल्या प्रेमळ नात्याची पोचपावती प्रेक्षकांना दिली.आता हीच जोडी तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे आणि त्यात विशेष म्हणजे मानसपितापुत्राची ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्याच भूमिकेत दिसणार आहेत.हा चित्रपट कोणता? या चित्रपटाची कथा काय? पितापुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्त्यात असली तरी या जोडीला पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल, यात शंका नाही.सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.अशा या सर्व होतकरू तरुणांचे नेतृत्व करणारा सिनेमा लवकरच मराठीच्या मोठ्या पडद्यावर येत आहे.'मी पण सचिन' असे या सिनेमाचे नाव असून,नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर फर्स्ट लुकसह मुहूर्त करण्यात आला. गणराज असोसिएटसने आतापर्यंत प्रस्तुत आणि निर्मित  केलेल्या हिट चित्रपटांच्या यादीत आता लवकरच 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव यात लेखक आणि दिग्दर्शक अश्या दुहेरी भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.