Join us  

गौरव नसिरुद्दीन शाहमुळे मराठी अभिनय क्षेत्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2016 8:09 AM

नसिरुद्दीन शाह यांच्याविषयी आदर व्यक्त करताना गौरव घाटनेकर सांगतो, “माझ्या गुरुने मला बनवलं आहे. मी आज जे काही बनलो ...

नसिरुद्दीन शाह यांच्याविषयी आदर व्यक्त करताना गौरव घाटनेकर सांगतो, “माझ्या गुरुने मला बनवलं आहे. मी आज जे काही बनलो आहे, शिकलो आहे माझ्या पायावर खंबीर उभा आहे ते फक्त नसिरुद्दीन शाह सरांमुळे. त्यांनी मला वरवरची स्थिती न सांगता सत्यस्थिती सांगितली. त्यांच्या या शिकवणीमुळे मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील.” अभिनय क्षेत्रात नसिरुद्दीन शाह यांच्या मार्गदर्शनाविषयी गौरव सांगतो, “The Caine Mutiny Court Martial या नाटकांत मी त्यांच्यासोबत काम करायचो. त्यादरम्यान मला स्टार प्रवाहकडून मालिकेसाठी विचारण्यात आले होते. मालिका मराठी होती आणि मी उर्दू आणि हिंदी भाषेत ट्रेण्ड झालो होतो. पण त्यावेळी नसिरुद्दीन सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि म्हणाले ‘अभिनयाला कोणत्याही भाषेचं बंधन नसतं.’ मराठी क्षेत्रात त्यांच्यामुळे मी आलो. मराठीत काम करण्याचा विचार कधी माझ्या मनात नव्हता पण त्यांनी माझी मानसिकता पूर्णपणे बदलली आणि आज मराठी मनोरंजनसृष्टीमुळेच मला नाव मिळालं. या सर्व गोष्टींसाठी मी नसिरुद्दीन शाह यांचा मनापासून आभारी आहे.”