Exclusive : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात लवकरच येणार नवा पाहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 16:29 IST
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये ...
Exclusive : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात लवकरच येणार नवा पाहुणा
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते. त्यांच्या फॅन्ससाठी आम्ही एक गुड न्यूज घेऊन आलो आहोत. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे यांच्या घरात एक चिमुकला पाहुणा येणार आहे. उर्मिला गरोदर असून कोठारेंच्या कुटुंबात लवकरच एका छोट्याशा बाळाचे आगमन होणार आहे.उर्मिला गरोदर असल्याची बातमी आदिनाथनेच सीएनएक्स मस्तीला दिली असून तो सध्या प्रचंड खूश आहे. तो त्याच्या कामात व्यग्र असला तरी तो प्रत्येक क्षण उर्मिलासोबत घालवण्याचा प्रयत्न करत आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले.