Join us

Exclusive संस्कृती बाल बाल बचावली ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 13:51 IST

 प्रियांका लोंढे                        होय.. हे खरे आहे, सध्या ...

 प्रियांका लोंढे                        होय.. हे खरे आहे, सध्या परशा म्हणजेच आकाश ठोसर सोबत अनेक फोटोंमध्ये दिसणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे बाल बाल बचावली आहे असेच म्हणावे लागेल.  महेश मांजरेकर यांच्या एफयु या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या झापाट्यात सुरु आहे. या चित्रपटात संस्कृती बालगुडे, आकाश ठोसर आणि सत्या मांजरेकर आपल्याला एकत्र दिसणार आहेत. नूकतेच या चित्रपटाची टिम इटलीमध्ये शुटिंगसाठी गेली होती. या संपुर्ण टिमचे इटलीमधील मजा-मस्ती करतानाचे फोटो देखील सोशल साईट्सवर वायरल झाले होते. पण तिथेच  एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संस्कृतीचा अपघात झाला. त्याचे झाले असे की, इटलीमध्ये संस्कृतीच्या एका गाण्याचे शुटिंग सुरु होते. हे गाणे एका तळ््याकाठी चित्रीत करायचे होते. गाण्याचा सेट लागला, सर्वजण शुटिंगसाठी जमले, कोरिओग्राफी सुरु होती. अन अचानक संस्कृतीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडू लागली पण दैव बलवत्तर म्हणुन संस्कृतीला बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कोरिओग्राफरने पाण्यात उडी मारली आणि तिला सुखरूप वाचवले. या अपघाता बद्दल संस्कृतीने सीएनएक्सला माहिती दिली. ती म्हणाली, इटलीमध्ये एका तळ््याकाठी गाण्याचे शुटिंग करायचे होते. पण मला त्या पाण्याच्या खोलीचा काही अंदाज आला नाही. तिथे दोन दगड होते आणि मला एका दगडावरुन दुसºया दगडावर उडी मारायची होती. नेमके त्याच दरम्यान दगडावरून माझा पाय घसरला आणि तोल जाऊन मी पाण्यात पडले. मला पोहता येत नसल्याने मी बुडू लागले पण तेवढ्यात कोरिओग्राफरने उडी मारून मला बाहेर काढले. पाण्यातून बोहर आल्यावर मला समजले की हाताला-पायाला चांगलाच मार लागला आहे. पण काही झाले तरी शुटिंग पुर्ण करायचे होते मग शो मस्ट गो आॅन प्रमाणे मी पुन्हा शुटिंगसाठी उभी राहिले. क्या बात है संस्कृती याला म्हणतात प्रोफेशनॅलिझम.