Join us

Exclusive कोठारे व्हीजन रंगभुमी गाजविण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 19:40 IST

 प्रियांका लोंढे               मालिका, चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता कोठारे व्हीजन नाट्यसृष्टीमध्ये पदार्पण करीत ...

 प्रियांका लोंढे               मालिका, चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता कोठारे व्हीजन नाट्यसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहेत. प्रेक्षकांसाठी एका वेगळ््या विषयावरील नवीन नाटक कोठारे व्हीजन घेऊन येत आहेत. याबद्दलची अधिकृत आणि एक्सक्लुझिव्ह माहिती अभिनेता आदिनाथ कोठारेने सीएनएक्सला दिली आहे. आम्हाला एक चांगली कथा मिळाल्याने नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय कोठारे व्हीजनने घेतला आहे. या नाटकाची कथा नितीन दिक्षितने लिहिली आहे. आणि नाटकाचे दिग्दर्शन देखील नितीनच करणार आहे. अजुन या प्रोजेक्टवर आमचे काम सुरु आहे. सध्या अनेक कामांमध्ये व्यस्त असल्याने हे नाटक लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रेक्षकांनी आजपर्यंत चित्रपट, मालिकांवर भरभरुन प्रेम केले आहे. नवीन नाटक देखील दमदार असल्याने ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. महेश कोठारे यांनी अभिनय, दिग्दर्शन केल्यानंतर कोठारे व्हीजनची स्थापना केली. कोठारे व्हीजन या बॅनर अंतर्गत त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया या मालिका सध्या टेलिव्हीजनवर गाजत आहेत. लवकरच कोठारे व्हीजन आवाज या मालिकेमधील अहिल्याबाई होळकर हा एपिसोड प्रेक्षकां समोर घेऊन येत आहेत. आता त्यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे प्रेक्षकांना नक्कीच रंगभुमीवर चांगली कलाकृती पहायला मिळणार हे खरे.