Join us  

'ड्राय डे' चढवणार पावसाळी पार्ट्यांचा हँँगओव्हर,एकदा पाहाच हे बहारदार गाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 5:43 PM

१३ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत असून सिनेमात मनमौजी तरुणाईची धम्माल-मस्ती दाखवण्यात आली आहे. पांडुरंग जाधव लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाचे नाव जरी 'ड्राय डे' असले तरी, आजच्या तरुण पिढीची चंगळ यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

श्रावणाच्या आगमनापूर्वी आषाढ महिन्याच्या पाऊसात ठीकठिकाणी होत असलेल्या, ओल्या पार्ट्यांची झिंग आता आणखीन वाढणार आहे. त्यामुळे याच हंगामात, आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील यांची निर्मिती असलेला 'ड्राय डे' हा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. येत्या १३ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत असून  सिनेमात मनमौजी तरुणाईची धम्माल-मस्ती दाखवण्यात आली आहे. पांडुरंग जाधव लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाचे नाव जरी 'ड्राय डे' असले तरी, आजच्या तरुण पिढीची चंगळ यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

'ड्राय डे' सिनेमात लव्हस्टोरी नव्हे तर ब्रेकअप नंतरची धम्माल दाखवली गेली असल्यामुळे, बॅचलर्स लोकांसाठी हा सिनेमा मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे. रंगभूमी व छोट्या पडद्यावर झळकलेला ऋत्विक केंद्रे या सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून, त्याच्या सोबतीला मोनालिसा बागल ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. एका मद्यधुंद रात्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या'ड्राय डे' मध्ये  कैलाश वाघमारे, पार्थ घाटगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक हे युवा कलाकारदेखील झळकणार आहेत.     

 'ड्राय डे' या आगामी सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'ड्राय डे' सिनेमाबद्दल सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड स्टार नावाझुद्दीन सिद्धिकीने 'ड्राय डे' सिनेमासाठी अभिनेता ऋत्विक केंद्रेला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरची लिंकदेखील त्याने आपल्या ट्वीटरवर पोस्ट केली असल्यामुळे, 'ड्राय डे' बाबत सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.सुपरहिट गाण्यांचा तडका आणि तरुण कलाकारांचा ताफा असलेल्या या सिनेमात सुरहिट  सिनेमा रसिकांनी पाहावा अशा सिनेमाची टीमने रसिकांना आवाहनही केले आहे.