Join us  

डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 4:16 AM

"डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो  संपूर्ण महाराष्ट्राच्या चित्रपटगृहातल ...

"डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो  संपूर्ण महाराष्ट्राच्या चित्रपटगृहातल उद्या प्रदर्शित होतो आहे. हा चित्रपट डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर प्रक्षेपित केला असून कसे त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थाननिर्माण केले आहे तसेच त्यांच्या आईने स्वतःची एक किडनी तात्यांना दान करून त्यांना पुनर्जन्म देऊन समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेशही यातून दिला आहे. या चित्रपटातील प्रत्येक घटना सत्य आहे. कुठेही अतिरंजीतपणा नाही.या चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला असून 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू'...  साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायले आहे. “का रे माझ्या मना छळतोस तू मला” हे तात्यारावांच्या जीवन त्यांच्या बालपणीचा कठोर संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गोरगरीबांसाठी दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स सुरू करण्यात येतील. यापैकी एक हॉस्पिटल मुंबईत तर दुसरं औरंगाबादमध्ये उभारण्यात येणार आहे. या दोन्ही हॉस्पिटलमधून कोणताही रुग्ण पैशांअभावी उपचाराविना माघारी जाऊ नये अशी आमची योजना असेल. यातून अनेक विद्यार्थ्यांना मेडीकलचं प्रशिक्षण घेता येईल. अनेक डॉक्टर्स घडतील. रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही काही व्यवस्था करण्याचा डॉ. तात्या लहानेचा विचार आहे. उपचारासोबतच योग्य आहार देण्याकडे आमचा कल असेल असेही डॉ. तात्या लहाने म्हणाले.डॉ.लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष व त्यांच्या आईची त्यांना मिळालेली साथ एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. डॉ. तात्या लहाने यांचीही "बायोपिक" आजच्या तरुणाईसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. हा चित्रपट समाजाला नवीन दिशा व विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य व प्रेरणा देणारा ठरेल. शिवाय अवयवदान व आईची हृदयस्पर्शी सत्यकथा बघावयास मिळणार आहे.