Join us  

तुम्ही कधी अभिनेता चिन्मय उद्गीरकरच्या पत्नीला पाहिलंत? तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 7:00 AM

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. 

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं.  तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.  आज आम्ही तुम्हाला अभिनेता चिन्मय उद्गीरकरबाबत सांगणार आहोत. 

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात  काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे  चिन्मय उद्गीरकरची आणि त्याच्या पत्नीची. फार कमी जणांना माहिती आहे अभिनेता चिन्मयची पत्नी देखील अभिनेत्री आहे. 

चिन्मयने अभिनेत्री गिरीजा जोशीसोबत लग्न केले आहे. विराज राजे यांनी दिग्दर्शित केलेल्या वाजलीच पाहिजे या चित्रपटात चिन्मय उद्गीरकर व गिरिजा जोशी यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात काम करताना चिन्मय व गिरिजा यांच्यातील मैत्री वाढली व मैत्रीचे रूपांतर विवाहबंधनात झाले.

अभिनेत्री गिरिजा जोशीने सतीश मोतीलिंग दिग्दर्शित 'प्रियतमा' या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिचे देऊळ बंद, वाजलीच पाहिजे असे तिचे चित्रपट प्रदर्शित झाले. चिन्मय स्वप्नांच्या पलीकडले आणि नांदा सौख्यभरे या मालिकेतून घराघरात पोहोचला. मालिकांसोबत त्याने अनेक चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकरसेलिब्रिटी