Join us  

फेअर की अफेअर?; पूजा सावंत आणि विवाहित अभिनेत्यामधील 'या' चॅटिंगचा अर्थ काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 6:30 PM

पूजा पहिल्यांदात व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

पूजा सावंत नेहमीच तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण पहिल्यांदात ती तिच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिचे मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर सुरू असल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. हा अभिनेता विवाहित असून या दोघांच्या चॅटिंगचे काही स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, गश्मीर आणि पूजा यांच्या या चॅटिंगवरून गश्मीर पूजासमोर प्रेमाची कबुली देणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पण हे खरेच चॅटिंग आहे की कोणत्या चित्रपट अथवा वेबसिरिजचे प्रमोशन आहे अशी देखील चर्चा रंगली आहे. कारण सध्या प्रमोशनसाठी असे अनेक फंडे वापरण्यात येतात. त्यामुळे खरंच त्यांच्यात अफेअर सुरू आहे की त्यांच्या कोणत्या नव्या प्रोजेक्टची ते उद्या घोषणा करणार आहेत का याची उत्सुकता देखील त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर'मध्ये परीक्षकाची भूमिका साकारते आहे.

मराठीतील एक हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनीची ओळख आहे.आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या गश्मीरच्या फोटोंना नेहमीच चाहते भरघोस पसंती देत असतात. कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी सिनेमातून झळकलेल्या गश्मीरने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. अभिनेते रविंद्र महाजनी यांचा गश्मीर मुलगा आहे. सिनेमासह गश्मीरने रंगभूमीही गाजवली आहे. अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ या भव्य महानाट्यात त्याने बाजीराव पेशवेंची भूमिका साकारली होती.

टॅग्स :पूजा सावंतगश्मिर महाजनी