या नवीन मालिकेचे नाव आहे ‘प्यार,लग्न या फूल २ लोचा?’. मालिकेच्या नावावरुन नक्की हा काय झोल आहे असं प्रेक्षकांना वाटत असेल ना? मग पाहा या मालिकेचे शीर्षक गीत-
‘प्यार, लग्न या फूल २ लोचा?’ या मालिकेच्या शीर्षक गीतेचे बोल विशाल यांनी लिहिले आहे तर बिपीन आर. जे. आणि विशाल यांनी संगीत दिले आहे आणि क्षितीज-तान्नुम यांनी गायले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महेश लिमये यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले आहे.
झी युवा वाहिनी आणि त्यावरील मालिका महाराष्ट्रातील प्रेक्षकांना २२ ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे.