रत्नाकर ली. पिळणकर नकलाकार, मिमिक्री आर्टिस्ट, लेखक, गीतकार, कवी, पटकथालेखक, संगीतकार, ध्वनिमुद्रकआणि वास्तुसल्लागार अशा विविधरंगी भूमिकेमुळे आपल्या परिचितांमध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कालक्षेत्राच्याभ्रमंतीला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या कारकिर्दीतील अनुभवांचा आढावा ते मनोरंजकरित्या घेतातआणि त्यांच्या संगीतामुळे तर त्या प्रवासाची रंगत अधिकच वाढते. या हसऱ्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे 'खूळखुळा'.गेल्या काही वर्षात त्यांनी अमेरिकेतील मराठी मंडळासाठी बरेच प्रयोग केले आणि आता तोच कार्यक्रम ते काही आकर्षकबदलांसह मुंबईत सादर करणार आहेत. त्याचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी७.३० वाजता, रवींद्र नाट्यमंदिर पु. ल. देशपांडे सभागृह येथे सादर केला जाणार आहे. 'खुळखुळाच' निवेदन कवियत्री,लेखिका संगीता शेंबेकर करणार असून, वाद्यवृंद संयोजक आहेत अशोक जाधव आणि दिलीप हडकर. गायनाची बाजूकिरण शेंबेकर व ईश्वर सोळंकी सांभाळतील.
हा कार्यक्रम चित्रपट व वाद्यवृंद सृष्टीतील निमंत्रितांसाठी असून निर्माता, दिगदर्शक व फिल्मसिटीचे अशासकीय अधिकारीश्री. मिलिंद लेले, तसेच शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील नगरसेवक व नेते श्री. रवींद्र मिर्लेकर, श्री. पांडुरंग सपकाळ आणिअनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
'खुळखुळा' कार्यक्रमात सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्या संस्थांच्या आर्थिक सहाय्यासाठी प्रेक्षकांना मदतीचे आव्हानकरण्यात येईल व ते उत्पन्न त्याचवेळी संस्थेच्या नावासह जाहीर करण्यात येईल. 'कलेतून कर्तव्याकडे' असे ह्याकार्यक्रमाचे ब्रीदवाक्य आहे.