Join us  

कॉलेज डायरी'ची उलगडणार पानं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 5:47 PM

अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' हा चित्रपट १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्दे'कॉलेज डायरी'ची कथा ही कॅम्पसमध्ये घडतेसंवाद अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विशाल सांगले यांचे आहेत

हळुवार स्वप्नांची नशा... स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द... अनोळखी दिशांत आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे 'कॉलेज डायरी'. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी'ची पानं लवकरच उलगडणार असून केवळ धमाल-मजा-मस्ती यावर वरवर भाष्य करणारा नव्हे तर कॉलेजविश्वात घडणाऱ्या अनुचित घटनांचा मागोवा घेणाऱ्या 'कॉलेज डायरी'चा ट्रेलर आज सोशल मीडियावर लॉन्च झाला आहे. अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' हा चित्रपट १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

'कॉलेज डायरी'ची कथा ही कॅम्पसमध्ये घडते. कॉलेज म्हणजे केवळ मजा-मस्ती-धम्माल असे मानणाऱ्या काही मित्रांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांभोवती फेर धरणारी अनिकेत जगन्नाथ घाडगे यांची कथा खिळवून ठेवणारी आहे.संवाद अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विशाल सांगले यांचे आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर,शुभम राऊत, शिवराज चव्हाण,प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'कॉलेज डायरी'ची थरारक गोष्ट उलगडण्यापूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. मराठी सिनेसंगीतक्षेत्रात नवा विक्रम करणारा 'कॉलेज डायरी' पाच भाषांतील गाण्यांमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाचही भाषांमधील सोशल पोर्टल्सवरील गाणी साऱ्यांच्याच ओठी रुळली आहेत.  रोमांचकारी घटनाक्रमांचा चढता-उतरता आलेख दाखविणारा 'कॉलेज डायरी'च्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हे नक्की.

टॅग्स :कॉलेज डायरी