Join us  

"सुरुवात चांगली झाली...", Chandrayaan-3च्या यशस्वी उड्डाणानंतर हेमंत ढोमेने केलेलं ट्वीट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 4:03 PM

Chandrayaan-3 : हेमंत ढोेमेने शेअर केला चंद्रयान-३च्या यशस्वी प्रक्षेपणाचा व्हिडिओ, म्हणाला...

इस्त्रोच्या चंद्रयान-३ च्या प्रक्षेपणाकडे देशवासीयांसह अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. शुक्रवारी(१४ जुलै) दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी चंद्रयान-३ने श्रीहरीकोटा येथून अवकाशात यशस्वी झेप घेतली. या ऐतिहासिक क्षणानंतर सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या कामगिरीसाठी इस्त्रोचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. आता मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमेने इस्त्रोसाठी ट्वीट केलं आहे. 

हेमंत ढोमेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन चंद्रयान-३च्या प्रक्षेपणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. चंद्रयान-३ अवकाशात यशस्वी झेप घेतानाचा ऐतिसाहिक क्षणांचा व्हिडिओ हेमंत ढोमेने ट्वीट करत इस्त्रोचं अभिनंदन केलं आहे. "चंद्रावर जाण्याचा चंद्रयान-३चा प्रवास सुरू झाला आहे. सर्व शास्त्रज्ञांचे आणि @isro चे आभार! आम्हा सगळ्यांना तुमचा प्रचंड अभिमान आहे! आणि तमाम देशवासीयांचे अभिनंदन! Fingers crossed! सुरूवात चांगली झालीय, शेवट सुद्धा चांगलाच होणार… जय हिंद!" असं हेमंतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

'सीमा हैदर हिच...'; पाकिस्तानातून आलेल्या महिलेबाबत 'गदर'च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत

बाईपण खरंच भारी बाबा! सिनेमासाठी महिलांनी केला ४५ किमीचा प्रवास

चंद्रयान मोहिमेसाठी आत्तापर्यंत या रॉकेटने १०० टक्के यशस्वी प्रक्षेपण केले आहे.पुढे चंद्रावर ऐतिहासिक लॅण्डिंगच्या यशाबद्दलही शास्त्रज्ञ आशावादी आहेत. आज ठरल्याप्रमाणे २.३५ मिनिटांनी या चंद्रयानाने अवकाशात झेप घेतली. आता, पुढील ४२ दिवस या यानाकडे इस्रोतील शास्त्रज्ञांचे लक्ष असणार आहे. 

टॅग्स :चंद्रयान-3मराठी अभिनेताइस्रो