Join us

चंद्रकांत कुलकर्णी आणि डॉ. विवेक बेळे प्रथमच एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 16:00 IST

‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’,’अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ आदी नाटकांचे लेखक डॉ. विवेक बेळे आणि ‘चारचौघी’, ‘वाडा चिरेबंदी ‘ ...

‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’,’अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ आदी नाटकांचे लेखक डॉ. विवेक बेळे आणि ‘चारचौघी’, ‘वाडा चिरेबंदी ‘ पासून ते ‘साखर खाल्लेला माणूस’ पर्यंत गेली ३० वर्ष सातत्यानं दर्जेदार नाटकं  देणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी प्रथमच एकत्र येतायत. बेळे यांची नवी कुरकुरीत कॉमेडी ‘कुत्ते कमीने!’ नाटक आत्ता तालमींमध्ये आहे. ‘जिगीषा आणि अष्टविनायक’ यांची निर्मिती असलेलं हे नाटक ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात रंगभूमीवर अवतरणार आहे. नावापासून कथानकापर्यंत आणि कलाकारांच्या निवडीपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर हे नाटक आपलं वेगळेपण जपणारं ठरेल असं दिसतंय. ‘कुत्ते कमीने!’ असं कोण कुणाला म्हणतंय? यामागील गुपित गुलदस्त्यात असल्याने रसिकांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.वेगळे आकृतीबंध आणि संवादाची खास ‘बेळे स्टाईल’ आधीच्या नाटकांमधून रसिकांपर्यंत पोहोचलेली आहेच. यावेळी ‘बेळे – कुलकर्णी’ ही युती नेमकं काय घेऊन येतायत ? प्रदीप मुळ्ये नेपथ्यात काय नवी आयडिया करतील? राहुल रानडेंच्या पार्श्वसंगीत नेमकं काय दडलंय? याविषयीची चर्चा नाट्यवर्तुळात सुरु झालीय. कोण कोण कलावंत असणार आहेत?’ याचाही रहस्यभेद लवकरच होईल.तसेच या नाटकात सुचित्रा एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. जवळजवळ २० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकानंतर त्या मालिका आणि चित्रपटांत बिझी झाल्या होत्या. ‘कुत्ते कमीने!’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत त्या म्हणाल्या की, जरी २० वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर कमबॅक करत आहेत.मध्यंतरीच्या काळात चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. ‘कुत्ते कमीने!’च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत असल्याचे सुचित्रा बांदेकर यांनी म्हटले आहे.