Join us

सेलिब्रिटींचा बप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 17:20 IST

पडद्यावर सेलिब्रेटींना आपण देवाची भक्ती करताना पाहतो...मात्र रियल मध्येही सेलिब्रेटींना बाप्पा आठवतोय..पाहुयात कोणकोणते सेलिब्रेटी रमले बाप्पाच्या भक्तीत ते..

पडद्यावर सेलिब्रेटींना आपण देवाची भक्ती करताना पाहतो...मात्र रियल मध्येही सेलिब्रेटींना बाप्पा आठवतोय..पाहुयात कोणकोणते सेलिब्रेटी रमले बाप्पाच्या भक्तीत ते..अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही बाप्पाच्या भक्तीरंगात रंगलेले दिसतायेत.प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरीही बाप्पांचे आगमान झाले आहे. सध्या तो हि फेस्टिव्हल मूडमध्ये दिसतो आहे.पोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णीच्या पुण्याच्या घरी 'बाप्पा' विराजमान झाले आहेत. पुणेकर असलेल्या कुलकर्णी कुटुंबातील हा पिटुकला बाप्पा, गोंडस आणि गोजिरा आहे. आपल्या आगामी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत सोनालीने आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक पद्धतीनुसार घरच्या गणपतीचे स्वागत केले.भूषण प्रधानच्या घरी ही बप्पांचे आगमन झाले आहे. भूषणला बप्पांसोबत सेल्फि घेण्याचा मोह आवरला नाहीय.सिद्धी कारखानीसने ट्रेडिंशनल लूकमध्ये मोठ्या थाटात-माटात बाप्पांचे स्वागत केले आहे.