Join us  

या कारणामुळे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये कुशल बद्रिकेने साकारली नाही स्त्री भूमिका, काय होतं कारण?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 7:15 AM

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यांत दाढी वाढवलेला कुशल पाहायला मिळतो. या फोटोसोबत त्याने शेअर केलेली पोस्ट महत्त्वाची आहे.

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. स्त्री पात्रसुद्धा मोठ्या खुबीने तो साकारतो. हे पात्र साकारतानाही त्याचं कॉमेडीचं अफलातून टायमिंग दिसून येतं. स्त्री पात्र अत्यंत सफाईने आणि मोठ्या खूबीने तो साकारतो. त्यात जराही वावगेपण किंवा अश्लीलपणा वाटत नाही. त्यामुळंच कुशलची स्त्री पात्रंही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. 

फारूळेबाई असो किंवा मग खवट सासूबाई किंवा मग एखादी नटी मोठ्या खूबीने कुशल या भूमिका साकारतो. मात्र गेल्या काही दिवसांत चला हवा येऊ द्या या शोमध्य् कुशलने स्त्री पात्र साकारलं नव्हतं. यामागे काय कारण होतं याचा प्रत्येक रसिक विचार करत होता. तो अशा भूमिका साकारणार की नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता खुद्द कुशलने यामागचे गुपित उलगडलं आहे. स्त्री भूमिका का साकारल्या नाहीत याचं कोडं अखेर उलगडलं आहे. कुशल सोशल मीडियावर बराच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो.. नुकतंच कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यांत दाढी वाढवलेला कुशल पाहायला मिळतो. या फोटोसोबत त्याने शेअर केलेली पोस्ट महत्त्वाची आहे. 

एका सिनेमासाठी त्याने ही दाढी वाढवली होती. त्याच्या या सिनेमाचं शुटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सिनेमाच्या शुटिंगचा आणि वाढवलेल्या दाढीचा शेवटचा दिवस असं कुशलने पोस्टमध्ये म्हटले आहे. या दाढीमुळेच चला हवा येऊ द्या मधील स्त्री पात्रांना सुट्टी मिळाली होती असं त्याने पुढे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र आता दाढी काढल्यावर लवकरच स्त्री पात्रं साकारत थुकरटवाडीत धम्माल करणार असल्याचे संकेत कुशलने दिले आहेत. पुन्हा एकदा रसिकांच्या लाडक्या फारूळेबाई, खवट सासूबाई, हिंदी नट्या साकारणार असल्याचे कुशलने म्हटले आहे.

टॅग्स :कुशल बद्रिके