Join us  

​या कारणामुळे प्रेक्षकांना आवडत आहे ‘लगी तो छगी’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 10:50 AM

प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब असतं असं म्हटलं जातं. ज्या सिनेमाचं नशीब जोरदार तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोच. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ...

प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब असतं असं म्हटलं जातं. ज्या सिनेमाचं नशीब जोरदार तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोच. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘लगी तो छगी’ या सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक प्रोमोज, अनोखी मांडणी, आजच्या जमान्यातील संवाद, धडाकेबाज कथानक आणि नेत्रसुखद सादरीकरण यामुळे ‘लगी तो छगी’ या सिनेमाने अल्पावधीत आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं आहे.दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांनी ‘लगी तो छगी’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यासोबतच निर्माते दिप्ती विचारे, स्वाती फडतरे आणि अजित पाटील यांच्या जोडीने निर्मितीसुद्धा केली आहे. बंधू हेमराज साबळेच्या साथीने लेखन करीत शिवदर्शनने चौफेर कामगिरी केली आहे. ‘लगी तो छगी’च्या निमित्ताने कॅामेडी-सस्पेंस-थ्रिलर हा जॅानर हाताळताना सिनेमाला पूर्णपणे वेगळी ट्रीटमेंट देण्याचा शिवदर्शनने केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्यामुळेच पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तरूणाईला हा सिनेमा खूप आवडत आहे. यासोबतच मध्यमवयीन आणि ज्येष्ठांनाही या सिनेमाच्या मांडणी आणि कथानकाने भुरळ घालत आहे.छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिजीत साटमने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. याखेरीज रविंदर सिंगबक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज, शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आदी कलाकार विविध भूमिकांमध्ये आहेत. सर्वांनीच आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देत कथानकाला अनुरूप अभिनय केला आहे. प्रत्येक कलाकाराने आपापल्या बोलीभाषेवर घेतलेली मेहनत सिनेमा पाहताना जाणवते. यामुळे व्यक्तिरेखेची वेशभूषा, देहबोली आणि बोलीभाषा यांचा अचूक संगम घडलेला दिसतो.गीत-संगीताच्या बाबतीतही या सिनेमाने रसिकांना आकर्षित करत आहे. देवदत्त साबळे यांनी ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीताच्या जोडीला मंगेश कांगणे यांनी लिहिलेलं गीतही रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहे. मुंबईसह पुण्यात चित्रीत झालेल्या या सिनेमाचं छायांकन ही जमेची बाजू आहे. यासाठी सिनेमॅटोग्राफी प्रदिप खानविलकर यांचं कौतुक होत आहे. हे सर्व चित्र पाहता ‘लगी तो छगी’ हा सिनेमा मोठ्या पडद्यावर षटकार ठोकण्यात यशस्वी झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.Also Read : अभिजीत साटम आणि शिवदर्शनची या कारणामुळे पुन्हा जमली जोडी