आपण सर्वांपेक्षा वेगळे दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते आणि मुली तर त्यांच्या लुकविषयी फारच पझेसिव्ह असतात. आपला ड्रेस हा सर्वांमध्ये उठून दिसावा असे त्यांचे म्हणणे असते. एखाद्या पार्टीला, कार्यक्रमाला गेल्यावर आपल्यासारखाच ड्रेस घातलेली एखादी मुलगी दिसली तर काय होते हे वेगळे सांगायला नको. फिल्मी दुनियेत तर फॅशन, लुक आणि अॅक्सेसरीजकडे अभिनेत्री विशेष लक्ष देतात. पण असे असूनदेखील काही वेळा दोन अभिनेत्रींचा ड्रेस एकदम सेम टू सेम असतो. अमृता खानविलकर आणि नेहा पेंडसे यांनी एकदमच सारखा ड्रेस घातलेला एक फोटो सध्या सोशल साईट्सवर व्हायरल झाला आहे. हा फोटो बघून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. ड्रेसपर्यंत ठीक होते पण या दोघींनीही त्या ड्रेसमध्ये फोटो काढताना पोझदेखील अगदी सारखीच दिली आहे. पांढराशुभ्र घेरदार अनारकली घालून फेर धरत आपला सुंदर ड्रेस दाखवण्याचा मोह या दोघींनाही आवरला नाही. अमृताने काही दिवसांपूर्वी तिचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. आता नेहाचादेखील फोटो सोशल साईट्सवर झळकत आहे. त्यामुळे नक्की कोणी कोणाचा ड्रेस आणि फोटोची पोझ कॉपी केली हे गुलदस्त्यातच आहे.
सेम टू सेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 14:30 IST