Join us

सीमेवर लढणार्या जवानांच्या आयुष्यावर आधारीत चिञपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:49 IST

आपल्या पोटाची भूक भागविणार्या शेतकरी वर्ग , तसेच सीमेवर लढणाºया जवानांच्या आयुष्यावर आधारीत विडा एक संघर्ष हा चित्रपट लवकरच ...

आपल्या पोटाची भूक भागविणार्या शेतकरी वर्ग , तसेच सीमेवर लढणाºया जवानांच्या आयुष्यावर आधारीत विडा एक संघर्ष हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकरी वर्गावर निसर्गाने जो कोप पसरवलाय त्यातून त्यांना बाहेर निघण्याचा मार्गच दिसेना.अशा या शेतकरी वर्गाची बिकट परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न या चिञपटामार्फत करण्यात आला आहे. या चित्रपटात नवीन कलाकारांचा समावेश आहे. या  चिञपटाची निर्मिती अनिल माळी यांनी केली असून विजय शिंदे  यांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रतीक्षा मुंगेकर ,मेघा मोहिते, बबनराव घोलप या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नवीन मोरे यांचे संगीत असून विक्रम लाड यांनी नृत्य दिग्दर्शनाचे काम केले आहे.