Join us  

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूची म्हणजेच सिद्धार्थची पत्नी आहे ही नायिका, अक्षय कुमारसोबतही केले आहे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 5:02 PM

लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असताना ८ मार्च २००४ ला वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सुशांतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले असून त्यांचा सांभाळ त्याची पत्नी करते.

ठळक मुद्देसिद्धार्थने १९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला.

अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताज्या आहेत. या चित्रपटात आपल्याला शंतनू ही व्यक्तिरेखा पाहायला मिळाली होती. ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ रे ने साकारली होती. सिद्धार्थचे काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्यांच्या मुलांचा सांभाळ त्याची पत्नी करत आहे. त्याची पत्नी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध नायिका असून तिने एका चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारसोबत देखील काम केले आहे.

सिद्धार्थने १९७७ मध्ये आलेल्या ‘चानी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. १९८० मध्ये आलेल्या ‘थोडीशी बेवफाई’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. या चित्रपटात त्याला पद्मिनी कोल्हापुरे ह्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याने त्यानंतर ‘पनाह’, ‘तिलक’, ‘गंगा का वचन’ यांसारख्या अनेक चित्रपटात कामे केले. मनी रत्नम ह्यांच्या ‘वंश’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात त्याच्यावर चित्रीत करण्यात आलेले आके तेरी बाहो में हे गाणे प्रचंड हिट झाले होते. तसेच शाहरुख खान आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेल्या बाजीगर या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात त्याच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘छुपाना भी नही आता’ हे गाणे लोकप्रिय झाले होते.

सिद्धार्थने १९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला. शांतिप्रियाने अनेक तामिळ आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारच्या सौगंध या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया त्याची नायिका होती. ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रियाची छोटी बहीण आहे.

लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असताना ८ मार्च २००४ ला वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सुशांतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले असून शुभम आणि शिष्या अशी त्यांची नावं आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर शांतिप्रियाने चित्रपटात काम करणे खूप कमी केले होते. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी तिने आपल्या अभिनयाच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली. आता ती हिंदी मालिंकमध्ये काम करते.

टॅग्स :अशी ही बनवाबनवी