Join us  

सोनाली कुलकर्णी अप्सरा बनत अवतरणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 1:41 PM

छोट्या पडद्यावर 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे. सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी आता एक वेगळ्याच भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावर 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्राची अप्सरा सोनालीकुलकर्णी खुद्द 'अप्सरा आली' या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका निभावणार आहे. या कार्यक्रमात स्पर्धक महाराष्ट्रातील लोकनृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमात अखंड महाराष्ट्रातील टॅलेंटप्रेक्षकांना पाहायला मिळेल तसंच या कार्यक्रमात प्रेक्षक अनेक अदाकारा आणि त्यांच्या लावणीचा ठसका पाहू शकणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचा टिझर प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांचीकार्यक्रमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अप्सरा आली हा कार्यक्रम ५ डिसेंबरला रसिकांच्या भेटीस येणार आहे.हा कार्यक्रम आणि तिच्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली,"डान्स हे माझं पहिलं प्रेम आहे आणि अप्सरा आली सारख्या डान्स रिअॅलिटी शोच परीक्षण करण्याची माझ्यावर खूप मोठीजबाबदारी आहे. महाराष्ट्रातील लोकनृत्य या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे तसंच 'अप्सरा आली'मुळे लावणी नृत्याची परंपरादेखील प्रेक्षक पाहू शकतील. त्यामुळे मी या कार्यक्रासाठी खूप उत्सुकआहे आणि प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक असतील याची मला खात्री आहे."  

नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये सोनाली कठपुतली म्हणजेच कळसूत्री बाहुलीप्रमाणे नटली आहे. इतकंच नाही तर ती कळसूत्री बाहुलीप्रमाणे नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोनालीने कठपुतली का खेल अशी कॅप्शनही दिली आहे. व्हिडीओत दुसणारी ही सोनालीच आहे की सोनालीसारखी हुबेहूब दिसणारी कळसूत्री बाहुली आहे असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे. सोनालीच्या या कळसूत्री बाहुली व्हिडीओला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. फॅन्सकडून या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी