Join us

या हिंदी सिनेमात झळकणार अनुजा साठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 13:03 IST

मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्येही दाखवून दिली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी कलाकारांनी बॉलिवूडच्या बड्या बड्या बॅनर्सना ...

मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्येही दाखवून दिली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी कलाकारांनी बॉलिवूडच्या बड्या बड्या बॅनर्सना आणि दिग्दर्शकांवर मोहिनी घातली आहे. गेली वर्षानुवर्षे मराठी कलाकार आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत आहेत. आता याच कलाकारांच्या यादीत आणखी एक मराठमोळं नाव जोडलं गेले आहे. मराठमोळी अभिनेत्री आपल्या अभिनयानं बॉलिवूडकरांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहे. या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे अनुजा साठे. 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री मारलेल्या अनुजाची गाडी आता सुस्साट वेग पकडणार असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे. कारण तिच्या वाट्याला आणखी दोन बड्या बॅनर्सचे सिनेमा आलेत. तिच्या दोन सिनेमांचं सध्या शूटिंग सुरु आहे. या दोन्ही सिनेमात अनुजासह बॉलिवूडचे दिग्गज कलाकार काम करत आहेत.अनुजाच्या पहिल्या सिनेमाचं नाव 'रायता' असून दुस-या सिनेमाचं नाव 'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण' असं आहे. या दोन्ही सिनेमात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते काम करत आहेत. 'रायता' या सिनेमात अनुजाला अभिनेता इरफान खानसह काम करण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे 'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात अनुजा अभिनेता जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे. या दोन्ही सिनेमात अनुजाच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका आल्या आहेत. या भूमिकांसाठी अनुजासुद्धा बरीच मेहनत घेत आहे. बॉलिवूडमध्ये या सिनेमांच्या माध्यमातून झेप घेण्याचा अनुजाचा मानस आहे. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे. छोट्या पडद्यावरील पेशवा बाजीराव या मालिकेतही अनुजानं राधाबाई ही भूमिका साकारली होती.