Join us  

अंकुश चौधरी करतोय अनुराधाचे प्रमोशन, पोस्टरवर नेटकर्‍यांच्या भन्नाट कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 10:33 AM

अंकुश चौधरी (Ankush Choudhary) नेसुद्धा या वेबसिरीजचे पोस्टर शेअर करत प्रमोशन करताना दिसत आहे.

संजय जाधव (Sanjay Jadhav) यांची नवी वेबसीरिज 'अनुराधा' (Anuradaha Webseries) रसिकांच्या भेटीला येत आहे. सध्या या वेबसिरीजची प्रचंड चर्चा रंगत आहे. या वेबसिरीजचे हटके प्रमोशन करण्यात आल्यामुळे ही वेबसिरीज सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली होती. काही दिवसांपूर्वीच #Banlipstic हा हॅशटॅग खूप ट्रेंडमध्ये होता. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) पासून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) अशा अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी हा हॅशटॅग वापरत व्हिडीओ शेअर केले होते. सगळ्यात आधी तेजस्विनी पंडितने ''मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही...म्हणत #Banlipstic व्हिडीओ शेअर केला होता.'' हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही मोठा प्रश्न पडता होता. तेव्हापासून चर्चेला सुरुवात झाली होती.

चाहतेच नाहीतर अनेक सेलिब्रेटी देखील संभ्रमात होते. व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे वारंवार चाहते  #Banlipstic हॅशटॅग नेमकं काय आहे ? असे प्रश्न विचारत होते. तर काहींना हा प्रमोशनचा भाग असावा याचा अंदाज सुरुवातीलाच आला होता.अगदी तसेच झाले. #Banlipstic हॅशटॅगचा वापर करत अनुराधा वेबसिरीजचे हटके प्रमोशन करण्यात येत होते हे समोर आले. वेबसिरीजचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते.

आता अभिनेता अंकुश चौधरीनेसुद्धा या वेबसिरीजचे पोस्टर शेअर करत प्रमोशन करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्याने एक समर्पक अशी कॅप्शनी दिली आहे. ''आपल्या मित्रांची मराठी वेब सिरीज''... म्हणत तो अनुराधाचे खास प्रमोशन करताना दिसतोय. अंकुशच्या या पोस्टने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पोस्टरवर अभिनेत्रीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी नेटकर्‍यांनी अभिनेत्रीचा चेहरा ओळखला आणि तेजस्विनी पंडित असल्याचे बोलताना दिसत आहे. तसेच या पोस्टरमध्ये तेजस्विनीच्या हातात सिगारेटही दिसून येत आहे.बोल्ड स्वरुपातले हे पोस्टर असल्यामुळे वेबसिरीजचा विषयसुद्धा बोल्ड असावा.

या पोस्टरवर चाहत्यांच्या कमेंट्सही येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेजस्विनी व्यतिरिक्त या वेबसिरीजमध्ये आणखी कोणत्या कलाकारांच्या भूमिका आहेत हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.तुर्तास 'अनुराधा' या वेबसिरीजचे होणारे हटके प्रमोशन पाहून सोशल मीडियावर कौतुकही होत आहे. पोस्टर समोर आल्यापासून वेबसिरीज पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :अंकुश चौधरीतेजस्विनी पंडित