Join us

अनिकेत आणि क्षितीची सुपरस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:43 IST

                झक्कास फोटो काढायला कोणाला आवडत नाही. आज प्रत्येकजणच सेल्फीच्या प्रेमात पडलेला ...

                झक्कास फोटो काढायला कोणाला आवडत नाही. आज प्रत्येकजणच सेल्फीच्या प्रेमात पडलेला दिसतो. मग आपले चंदेरी दुनियेतील तारे तरी कसे काय मागे राहतील बरं. कोणताही कार्यक्रम असो, पार्टी, प्रिमिअर किंवा सिनेमाच्या सेटवरील वेगवेगळे फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आता हेच पहा ना, क्षिती जोग ने देखील एक असाच भारी फोटो सोशल मिडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये क्षिती अनिकेत विश्वासराव सोबत मजा, मस्ती करताना दिसत आहे. दोघांनीही मस्त ब्ल्यु आणि रेड कलरचा गॉगल घालून हटके पोझ दिली आहे. त्यांच्या या फोटोला सोशल साईट्सवर चाहत्यांकडून अनेक लाईक्स मिळत आहेत. आता हा फोटो कोणत्या चित्रपटाच्या सेटवर काढलाय कि यामागे अजुन काही कारण ते मात्र गुलदस्त्यातच आहे. क्षिती आपल्याला एखाद्या मराठी चित्रपटात पहायला मिळणार का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. पण काळजी करू नका लवकरच समजेल की अनिकेत आणि क्षितीचा हा हटके अंदाज आपल्याला मोठ्या पडद्यावर पण पहायला मिळणार आहे का.