आणि सोनाली कुलकर्णीची दीपिका पादुकोणसोबत झाली तुलना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 14:32 IST
सोनाली कुलकर्णीने एक नवे फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील काही फोटो तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ...
आणि सोनाली कुलकर्णीची दीपिका पादुकोणसोबत झाली तुलना...
सोनाली कुलकर्णीने एक नवे फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील काही फोटो तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सोनालीने बांधणीचा ब्रायडल लेहेंगा घातला आहे. या फोटोंमध्ये सोनाली खूपच छान दिसत आहे. सोनाली या फोटोंमध्ये आपल्याला वधूच्या वेशात पाहायला मिळत आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सोनालीचे हे फोटोशूट भरत पवार यांनी केले असून मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे. कोहिनूर अहमदनगर यांच्या ब्राइडल कलेक्शनसाठी सोनालीने हे खास फोटोशूट केले आहे. सोनालीच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनाली या फोटोंमध्ये एखाद्या राणीसारखी दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. तिच्या काही फॅन्सने तर चक्क तिची तुलना दीपिका पादुकोण सोबत केली आहे. पद्मावत या चित्रपटात दीपिकाला घेण्याऐवजी तुलाच घ्यायला पाहिजे होते, इतकी तू सुंदर दिसत आहे असे तिच्या एका फॅनने कमेंटमध्ये लिहिले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ती दिवा आहेस असे देखील काहींचे म्हणणे आहे. सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. तिच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिचा हम्पी हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील सोनालीच्या लूकची आणि अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. Also Read : अप्सरा आली फेम सोनाली कुलकर्णीच्या कारकिर्दीला झाली १० वर्षं पूर्ण