Join us  

'आनंदी गोपाळ' सिनेमाचा दमदार ट्रेलर तुम्ही पाहिलात का ?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 12:13 PM

डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव फक्त भारतापुरतचं मर्यादीत नाहीत जगभरात हे नाव परिचयाचे आहे. पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाईंनी घेतला.

ठळक मुद्देपहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाईंनी घेतलाआनंदीबाईंचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास सिनेमाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार

डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव फक्त भारतापुरतचं मर्यादीत नाहीत जगभरात हे नाव परिचयाचे आहे. पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाईंनी घेतला. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा व संकटांचा सामना करावा लागणार. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे गोपाळरावांशी लग्न झाले. गोपाळराव विधुर होते आणि वयाने आनंदीबाईंपेक्षा तिप्पट मोठे होते. वयाच्या १४ व्या वर्षी प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय संसाधने उपलब्ध नसल्याने आनंदीबाईना त्यांच्या पहिल्या मुलाला गमवावे लागले. त्याच क्षणाला त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले. गोपाळरावांनी सुद्धा आपल्या बायकोला शिकवण्याचे ध्येय मनाशी बाळगले आणि तिच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचे प्रत्येक पाऊलावर समर्थन केले. आनंदीबाईंचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास सिनेमाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. 'आनंदी गोपाळ' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 सिनेमात ललित प्रभाकर गोपाळरावाची भूमिका साकारतो आहे तर अभिनेत्री  भाग्यश्री मिलिंद आनंदीबाई जोशींच्या भूमिकेत दिसतेय. 'ज्या देशास माझा धर्म मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’, असे दमदार डायलॉगस ट्रेलरमध्ये रसिकांची मनं जिंकतायेत. गोपाळरावांनी आनंदीबाईंना मराठी, इंग्रजी आणि संस्कृत कशी लिहितात आणि वाचतात त्याचे शिक्षण दिले. आनंदीबाई यांचे वयाच्या दहाव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले होते. गोपाळरावांनी लग्नानंतर आनंदीबाईंना शिकविले. पुढे अमेरिकेत पाठवून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या हा संपूर्ण प्रवास मोठ्या पडद्यावर पाहणं रोमांचकारी ठरणार आहे त्यासाठी रसिकांना १५ तारखेची वाट पहावी लागणार आहे १५ कारण   फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :ललित प्रभाकर