Join us  

फिटनेस फ्रिक अमृता खानविलकरच्या भन्नाट योगा पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 2:33 PM

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली अमृता तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की आपल्या फिटनेसमुळे इतर अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही अमृता तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.  अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. पण अमृता फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. अमृताच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.

 

अमृता तिच्या दिवसाची सुरुवात योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणाने करते. तिचे हे फोटो पाहून इतरांना फिट राहण्यासाठी योगा करण्याची प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.  डान्स, व्यायाम आणि योगा हेच अमृताच्याही सौंदर्याचं रहस्य आहे.अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली अमृता तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की आपल्या फिटनेसमुळे इतर अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. फिट राहण्यासाठी अमृता नियमित योगा करते. अमृताच्या योगा पोजेस पाहून तिच्या फोटोंना सोशल मीडियावर रसिकांकडून पसंती मिळते. 

आपल्या या योगाभ्यासाबद्दल अमृता खानविलकर म्हणते,''सध्या आजूबाजूचे वातावरण खूपच भयंकर आहे. त्यामुळे अनेकदा नैराश्यही येते. इतकी वर्षं या क्षेत्रात असल्याने शूटिंगच्या, मीटिंग्सच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत होत्या. मित्रमैत्रिणींना भेटणं होतं असे आणि अचानक माणसांचं भेटणं बंद झाल्याने, कुठेतरी मेंटल ब्लॉक झाला आहे. 

कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत असतानाच पडद्यामागे आम्हीही  एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगत असतो आणि त्यावेळी आम्हालाही  कुठेतरी नैराश्य, तणाव येतोच आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगा. मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी मी सध्या योगाला प्राधान्य देत आहे आणि याचा मला खूपच फायदा होत आहे. त्यामुळेच मी तुम्हालाही हेच सांगेन, की दिवसातला काही वेळ तुम्हीही योगासाठी द्या. या तणावपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपाय आहे.''

टॅग्स :अमृता खानविलकर