Join us  

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राने साजरी केली 3rd Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:22 AM

वाजले की बारा म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना अक्षरक्षा वेड लावले.मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने ...

वाजले की बारा म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना अक्षरक्षा वेड लावले.मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रिअॅलिटी शोनच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.सध्या अमृता खानविलकर खूप खुश आहे. त्याला कारणही खास आहे.'मेड फॉर इच अदर' कपल  अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा 24 जानेवारी 2015 ला  रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.अमृता ही मराठी आणि हिमांशू हा पंजाबी असल्यामुळे 'पंजाबी-मराठी' अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता.यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी अमृता लग्नात अतिशय सुंदर दिसत होती.अमृता आणि हिमांशुची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' सेटवरच या दोघांची  लव्हस्टोरी सुरू झाली होती. भेटल्यापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.जवळपास 10 वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचीही चांगली केमिस्ट्री जमली होती.10 वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.अमृताचा पती हिमांशु मल्होत्रा हा हिंदी टी.व्ही सृष्टीत काम करतो तर अमृता आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.तसेच इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशु दोघांनाही एक परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.Also Read:अमृता खानविलकरला पतीकडून सरप्राईज,वाढदिवसाचं असं केलं जंगी सेलिब्रेशनरसिकांची लाडकी बनलेली अमृताने तिचा वाझदिवसही जल्लोषात साजरा केला होता.मोठ्या उत्साहात रसिकांनीही अमृताला हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या होत्या.अमृताच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो हिमांशूने सोशल मीडियावर शेअर केले होते.वाढदिवसानिमित्त अमृताला पती हिमांशूकडून खास गिफ्टसुद्धा मिळालं होतं.अमृताच्या घरीही तिचा ३२वा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला होता.