Join us

अमेयने जोडले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 14:29 IST

 कास्टिंग काउच ही निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांची  वेबसीरीज आहे. फार कमी कालावधीत ही वेबसीरीज लोकप्रिय ठरली आहे. ...

 कास्टिंग काउच ही निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांची  वेबसीरीज आहे. फार कमी कालावधीत ही वेबसीरीज लोकप्रिय ठरली आहे. या वेब सीरीजमध्ये राधिका आपटे, प्रिया बापट, रिमा लागू, श्रिया पिळगावकर, सई ताम्हणकर, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, नागराज मंजुळे यांनी धमाल केली होती. पण आता, पहिल्यांदाच या वेबसीरीजमध्ये कोणीतरी भारदस्त व्यक्ती येणार असल्याची चर्चा सोशलमिडीयावर रंगू लागली आहे. तर तरूणांचा लाडका अभिनेता अमेय वाघ याने देखील या व्यक्तीसमोर चक्क हात जोडले आहेत. विचारात पडला ना अमेयला असं काय झालं की, त्याला हात जोडावे लागले. पण या गोष्टीचा खुलासा खुद्द अमेयनेच सोशलमिडीयावर केला आहे. अमेय म्हणतो, कास्टिंग काउच या वेबसीरीजमध्ये कोणीतरी येणार आहे ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडया दिवसांची वाट बघावी लागणार आहे.