Join us

रसिकांना पुन्हा लागणार ‘याड’ आणि ते पुन्हा होणार झिंग झिंग झिंगाट,सैराटच्या रिमेकबाबत अजय-अतुलचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:26 IST

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे सैराट. झिंग झिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच ...

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे सैराट. झिंग झिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. रसिकांप्रमाणेच सैराटची भुरळ बॉलीवुडलाही पडली. त्यामुळे बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा रिमेक बनवण्याचं ठरवलं. सध्या बॉलीवुडमध्ये सैराटचा रिमेक धडकची जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमात शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.'धडक' या सिनेमाच्या निमित्ताने अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. धडक सिनेमाची कथा सैराटप्रमाणेच असेल का, यांत बॉलिवूड मसाला सिनेमाला आवश्यक गोष्टी टाकून हा आणखी बोल्ड करण्यात आला आहे का, सिनेमाची कथा आणि गाणी कशी असतील अशा एक ना अनेक गोष्टींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सैराटचं संगीत आणि गाणी तुफान हिट ठरली होती. त्यामुळे धडकमध्ये तेच संगीत आणि गाणी असणार का याबाबतही उत्सुकता आहे. याच गोष्टीबाबत 'सैराट' आणि 'धडक' सिनेमाची संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी खुलासा केला आहे.'सैराट' सिनेमातील रसिकांना याड लावणारं ‘याड लागलं’ हे गाणं आणि रसिकांसह मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींनाही झिंग झिंग झिंगाट ताल धरायला लावणारे गाणं धडक सिनेमातही कायम ठेवण्यात येणार आहे.इतर गाण्यात बदल होतील मात्र ही दोन लोकप्रिय गाणी तशीच ठेवण्यात आल्याची माहिती अजय-अतुल यांनी दिली आहे.निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांच्या कास्टिंग काऊच या वेब सिरीजच्या तिस-या पर्वामधील दुस-या भागात महाराष्ट्राची लाडकी संगीतकार जोडी अजय-अतुल सहभागी झाले होते.त्यावेळी या जोडीने धडक सिनेमाच्या गाण्याबाबत हा खुलासा केला.SEE PICS:असा आहे अजय-अतुलचा पुण्यामधील आलिशान आशियाना!कधी प्रेमाच्या रंगात दंग व्हायला लावणा-या रोमँटिक तर कधी लहानथोरांना थिकायला लावणारे धमाकेदार संगीत अजय-अतुल या जोडीने दिले.आता पुन्हा एकदा ही जोडी बॉलिवूडच्या रसिकांना वेड लावण्यासाठी येत आहे.त्यांनी संगीत दिलेला सुपर-30 हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.या सिनेमात सुपरस्टार ह्रतिक रोशन अजय-अतुलच्या संगीतावर थिरकणार आहे. या सिनेमात ह्रतिकची प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे.बिहारमध्ये भारतीय गणितज्ञ आनंद कुमार नावाचे व्यक्ती असून ते सुपर-३०’ या नावाने ते हुशार असलेल्या मात्र गरीबीमुळे मागे पडणा-या विद्यार्थ्यांना ते मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम चालवतात.याच सुपर-30वर आधारित सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.तर सिनेमाच्या संगीताची धुरा अजय-अतुल या जोडीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.